छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचं स्वातंत्र्य
![]() |
| Chhatrapati shivaji |
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचं स्वातंत्र्य
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील जनतेला ,विजापूरच्या आदिलशाहि आणि मूघल या दोन सत्तां विरुध्द संघर्ष करून मराठ्यांचं स्वतंत्रपणे राज्य निर्माण केले. या ऐतिहासिक संघर्षानंतर मराठा स्वराज्याची रायगड ही राजधानी झाली व छ.शिवाजी महाराजांचा इ.स.1674मध्ये राज्याभिषेक झाला. छ.शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर,पुणे येथे झाला.
त्यांच्या आई जिजाबाई भोसले व वडील शहाजी राजे भोसले . महाराष्ट्रातील जहागीरी सांभाळण्याची जबाबदारी शहाजी राजांनी जिजाबाई व मोजक्या सरदारांना देवून त्यांची व्यवस्था शिवनेरी किल्ल्यावर केली होती, जिजाबाईंचा देशाभिमान, धैर्य, करारीपणा तसेच शिस्त अशा गुणांचे संस्कार शिवाजी महाराजांवर लहानपणापासून होत गेले,दादाजी कोंडदेव व इतर कर्तबगार सरदारांकडूनही शिवाजी महाराज शिक्षण घेत गेले.
लहानपणापासून स्वराज्य निर्माण करण्याच्या संस्कारांचा व या महत्वाकांक्षेचाच पूढे स्वराज्य निर्माण करण्याच्या व जूलमी सत्तांशी संघर्ष करण्याच्या कार्यात उपयोग झाला.लहानपणापासून घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक,शर्यती, कुस्ती हे खेळ खेळत शिवाजी महाराज राज्य, राज्यकारभार, लष्कर यांबाबत शिक्षणाचे धडे शिकत गेले, स्वराज्य स्थापन करण्याच्या स्फूर्ती तून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली परंतू हे कार्य एव्हडं सोपं नव्हतं.
आपल्या प्रखर बुद्धीमत्तेनं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा भोर जवळील रायरेश्वर महादेव मंदिरात करून सैन्य जमवलं हे सैन्य म्हणजेच मावळे, मावळ्यांना एकत्र करून त्यांनी जहागीरी संरक्षणासाठी बाकीचे कील्ले जिंकून घेण्याचं ठरवलं ,मोहिमा आखल्या. तोरना किल्ला व राजगड किल्ला त्यांनी सुरुवातीला काबीज केले या कामी त्यांनी देशमुख, वतनदार, देशपांडे इ.वर्गांशीही संबंध बनवले. दूर्गम कील्ले, रिकाम्या टेकडीचे प्रदेश, पडके कील्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेतले या दरम्यान त्यांना अनेक कर्तबगार अनुयायी येवून मिळाले त्यापैकी तानाजी मालूसरे,येसाजी कंक,बाजीप्रभू देशपांडे ,बाजी इ.होत परंतू या वेळेपर्यंत त्यांनी काहीकाळ आदिलशाहि शी एकनिष्ठता राखून आपली चळवळ सुरू ठेवली होती परंतू महाराजांनी कोंडाण्याचा सिंहगड जेव्हा किल्लेदाराला आपलंस करून जिंकला तेव्हा मात्र महंमद अदीलशहा अवाक झाला व शिवाजी महाराजांच्या तगड्या संघर्षाला सुरुवात झाली.
लेबल: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, मराठ्यांचा संघर्ष






0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ