सोमवार, २० जून, २०२२

श्री नवनाथ स्तोत्र

         ।श्रीनवनाथस्तोत्र

जय जयाजी गणधिपा , ॐ कराच्या सगुण स्वरोपा ॥ प्रथम नमुनी तुला बाप्पा ॥ माय सरस्वती वंदितो॥ १॥ 

 आ ता वंदन श्री गुरुनाथा ॥ दत्तात्रेय स्वामी समर्थ ॥ तुझिया चरनी ठेविला माथा ॥ स्फुर्थी दया नाथ कथा वर्णाया॥ २॥

 तुम्ही गुरु नवनाथांचे चरण धरिले मी तुमचे॥ लले पुरवा बालकाचे ॥ वाव्हे स्थिर हृदयी माझ्या ॥ ३॥ 

 तुमच्या दिव्या चरनांचे ध्यान॥ मी करितो ध्यान म्हणुनी वस्ति येउन ॥ अंतरी माझ्या करावी ॥ ४॥ 

 ही तुमचीच आहे इच्छा ॥ म्हणुनी जाहली मनीषा ॥ नाथ प्रताप दिव्या भाषा ॥ कवन रुपे गावी वाटे ॥ ५॥

 मर्त्य लोकी कलि येता॥ धर्मं बुडाला सवर्था ॥ त्या वेळी गुरु नाथ ॥ घेवून आलात नाथाना॥ ६॥

 प्रथम तो जहाला तो मछिन्द्रनाथ ॥ याचा जन्म मछली च्या उदरात॥ म्हणुनी नाम पावला तेच सत्य ॥ कलियुगी आले कवि नारायण ॥ ७॥ 

 दूसरा तो जहाला जालंदरनाथ ॥ हा अंतरिक्ष नाथ नारायण समर्थ ॥ बरुहा द्रव राजाच्या यदन्न कुंडात॥ प्रगत झाला स्वामी माझा ॥ ८॥ 

 तीसरा तो नागनाथ ॥ जन्म पावला नागिनिच्या उदरात ॥ हा अविर्होत्र नारायण समर्थ । धर्मं रक्षान्या प्रगटलासे ॥ ९॥ 

 चौथा तो रेवंनाथ ॥ चमस नारायण सिद्ध समर्थ ॥ त्याचाच हा अवतार सत्य ॥ मृत्यु लोकी प्र गट ला से ॥ १०॥

 पाचवा तो गोरक्ष नाथ ॥ हा प्र गट ला उकिरडयात ॥ हरी नारायण अवतार सत्य ॥ महा समर्थ सिद्ध योगी॥ ११॥

 पिप्पा ला यण नारायण समर्थ ॥ सहाव्या अवतारी प्र गट ला ॥ नाम धरिले चर्पतिनाथ ॥ तारावया भाविकांना॥ १२॥

 सातव्या अवतारी द्रमिल नारायण ॥ भरतुहारी म्हणुन ॥ आले अवतार धरून ॥ आद्न्या श्री हरीची म्हानुनिया ॥ १३॥

 आठवा अवतार कानिफनाथ ॥ हा प्रबुद्ध नारायण समर्थ ॥ जन्म ला से गज कर्नात॥ सिद्ध योगी समर्थ हा ॥ १४॥ 

 नवव्या अवतारी गहिनीनाथ ॥ कर्भंजन नारायण समर्थ ॥ मातीच्या पुतल्यात झाले प्रगट ॥ संजीवनी मंत्र जपता गोरक्षाने ॥ १५॥ 

 ऐसे अस्ति नव नारायण ॥ अयोनि सम्भव यांचा जन्म ॥ यांची किमया जानन्या कोण ॥ समर्थ असे या धरेवरी॥ १६॥ 

 असे नवनाथांचा भरी दरार ॥ काल कापे थरथरा ॥ देव दनावंचाही पारा ॥ उतरवला क्षणात नाथानी॥ १७॥ 

 जो जो नित्य करील पठान ॥ दिव्य नवनाथांचे स्मरण ॥ त्याचे नासेल सारे दैन्य ॥ संसारी सुखी होइल तो ॥ १८॥

लेबल: , , ,

बुधवार, ८ जून, २०२२

कानिफनाथ आरती


जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।

पतिपावना ओवळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

ऋषभपुत्र श्रीप्रभुध्द नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजस्वती ।।

नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रितवरुनी केली तपपूर्ती ।।

नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवुनि मिळवी वरप्राप्ती ।।

गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसुनि रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।

सुवर्णामुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।

सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथ तुमची ।।

गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळिती होऊनी हर्षभरी ।।

चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बीद्रावळी गजरी ।।

सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।

नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामधे मच्छिंद्रनाथे परिक्षिले समयी ।।

प्रेमे गोपीचंद रक्षिला असुनी अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।

जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तरली ।।

अवनी भ्रमुनि निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापुनि स्वानंदाने मढी पावन केली ।।

समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।

गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंदी झाला लीन चरणी ।।

लेबल: , , , ,

मंगळवार, ३१ मे, २०२२

 अध्याय २. कथासार

मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान

शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पहात पहात ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली. त्याची स्थिति पाहून या कलीमधे दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले.
मग दत्तात्रेय मच्छिंद्राजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहा, वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज ! आज मला येथे बारा वर्षे झाली. पण आजपावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारीत आहा, त्याअर्थी आपण कोण आहा हे प्रथम मला कळवावे व ज्याअर्थी आपले दर्शन झाले आहे त्याअर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला. मी अत्रि ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रेय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे, ती मला सांग. हे ऐकून, आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले. त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले; तेणेकरून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला, महाराज ! आपण साक्षात भगवान आहा. शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहा, असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगिकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला.
मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की, तू चिंता करू नको; तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर व विष्णु कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, ईश्वरावाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ति आहे. हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कविनारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरिले आणि त्याजकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथसंप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले. मग मच्छिंद्रनाथहि तीर्थयात्रा करावयास निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुति केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊन गेले. ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती; परंतु दैवत अनुकूल झाल्यावाचून कार्यसिद्धि व्हावयाची नाही अशीहि त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबेसन्निध सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतु मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग, म्हणून म्हणाली. त्याने सांगितले की, मातोश्री ! साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतु पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून, 'तुझे मनोरथ पूर्ण होतील.' असा देवीने त्यास आशीर्वाद दिला. मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदीप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले.
असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहात होती. पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहे, तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील, त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे शंभर आहेत; पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मूर्च्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करवा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल. असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्लवेल टाकिला. पुन्हा परत येऊन पाहू लागला, तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करिताच त्यास मूर्च्छना आली. म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याजजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील, म्हणून वर दिला.
सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरुन घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतु आहे, म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, कविता करावी असे माझ्या मनात आहे; तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतु पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये-जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला.
सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेाने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गोठ्याजवळ केरकचरा, शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती, त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.


शनिवार, २८ मे, २०२२

संतोषी माता व्रत कथा मराठी

माता संतोषी प्रतिमा 

 शुक्रवार संतोषी माता व्रत कथा

संतोषी माता व्रत कथा-

एक वृद्ध स्त्री होती, तिला सात मुलं होते. सहा कामाला जाणारे कमाई करणारे होते तर एक घरीच असायचा. म्हातारी बाई स्वयंपाक करायची,काम करणाऱ्या  सहा मुलांसाठी अन्न पुरवायची आणि जे काही  त्यांच्या ताटातील शिल्लक  उरले ते सातव्या मुलाला खायला द्यायची.

एके दिवशी तो सातवा मूलगा त्याच्या पत्नीस लाडाने  म्हणाला- बघ माझ्या आईचे माझ्यावर खूपच प्रेम आहे ती किती प्रेमाने स्वयंपाक करून मला जेवू घालते.

त्याची पत्नी म्हणाली- का नाही, सगळ्या भावांचे शिल्लक राहीलेलं जे तूम्हाला खायला घालते ना तुमची आई.

तो म्हणाला - असे होऊ शकत नाही. जोपर्यंत मी ते माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसनारच नाही.

सून हसली आणि म्हणाली - बघितले तरच विश्वास बसेल.

काही दिवसांनी सण आला. घरात सात प्रकारचे अन्न आणि  लाडू तयार केल्या  गेले,गंमत पहाण्यासाठी  डोके दुखत असल्याच्या बहाण्याने सातवा मूलगा डोक्यावर पातळ कपडा घालून स्वयंपाकघरातच झोपला. तो कपड्यांमधून बघत राहिला. सहा भाऊ जेवायला आले. त्याने पाहिले की आईने त्यांच्यासाठी  सुंदर आसनं घातले, विविध प्रकारचे स्वयंपाक व लाडू वाढले आणि त्यांना विनंती करून वाढले. तो बघतच राहिला.

जेवण झाल्यावर सहाजण उठल्यावर आईने त्यांच्या  ताटातून राहिलेल्या लाडूचे तुकडे(भूगा) उचलून एकच मोठा लाडू बनवला.

साफ सफाई  झाल्यावर वृद्ध आईने झोपलेल्या  सातव्या मूलाला हाक मारली - बेटा, सहा भावांनी जेवले, आता तू एकटाच राहिलास, कधी उठणार.

तो म्हणू लागला – आई, मला खायला वैगरे काही नको, मी आता परदेशात (दूर शहरात) निघून जातो.

आई म्हणाली - उद्या जातो तर तू आजच निघून जा.

तो म्हणाला- हो मी आजच जात आहे. असे बोलून तो रागानं घरातून निघून गेला.

निघण्याच्या वेळी  बायकोची आठवण झाली. ती गोठ्यात शेणाच्या गोवऱ्या थापत होती.

तिथे जाऊन तो म्हणाला, 

मी परदेशात (शहरात)जातोय आणि तिकडेच मेहनत करून पोट भरिल  ,तु मी येथे येई पर्यंत येथेच रहा तूला भेटायला मी  स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर नक्कीच येईन.

त्याची पत्नी म्हणाली -आनंदाने जा माझा विचार करू नका,मी तूमच्या  आठवणीं वरच तूमची वाट बघेन, देव तुम्हाला मदत करेल.त्यानं आठवण म्हणून आपल्या हाताच्या बोटातील अंगठी तीला दिली,

ती म्हणाली - माझ्याकडे तर आठवण म्हणून द्यायला काय आहे, हा शेणाने भरलेला हात आहे. असे म्हणत शेणाचा हात त्याच्या पाठीवर मारला. तो निघून गेला, चालत चालत  ,मजल दर मजल करता काही दिवसांत दूरच्या देशात (शहरात)पोहोचला.एका सावकाराचे दुकान होते. तो तिथे गेला आणि म्हणाला - सेठ, मला कामावर ठेवा.सावकाराला नोकराची गरज होती, 

परंतू - काम पाहून तुला पगार  मिळेल असं सांगून  त्याला सावकाराची नोकरी लागली, तो सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नोकरी करू लागला. काही दिवसात दुकानाचे सर्व व्यवहार, हिशेब, ग्राहकांना वस्तू विकणे ही सर्व कामे करू लागला. सावकाराचे सात-आठ नोकर होते, सगळ्यांना याचं चोख काम पाहून चक्कर यायला लागली,कारण तो खूप हुशार झाला.सेठनेही त्याचं काम पाहिले आणि त्याला तीन महिन्यांत अर्ध्या नफ्याचे हिस्सेदार  बनवले. तो काही वर्षातच एक प्रसिद्ध सेठ बनला आणि मालकाने संपूर्ण व्यवसाय त्याच्यावर सोडला.

इकडे  त्याची आई त्याच्या   बायकोला त्रास देऊ लागली, घरची सगळी कामं करून तिला सरपण लाकडे आणायला जंगलात पाठवी,  घरच्या पिठातून निघालेली चाळणाची भाकरी  व नारळाच्या  करवंटीतून  पाणी ठेवून,  नको ते बोल बोलू लागली . सूनही नशीबापूढं हतबल होती,नवर्‍याची येण्याची वाट पाही .ती एकदा लाकडे आणायला निघाली होती, वाटेत अनेक महिला संतोषी मातेचे व्रत करताना तिला दिसल्या.

ती कथा ऐकत तिथे उभी राहिली आणि तिने विचारले - बहिणींनो, तुम्ही कोणत्या देवाचं व्रत करता आणि त्याचे काय फळ मिळते. जर तुम्ही मला या व्रताचा नियम समजावून सांगितलात तर तूमचे  उपकार होतील .

तेव्हा एक महिला म्हणाली - ऐका, हे संतोषी मातेचे व्रत आहे. असे केल्याने , दारिद्र्य नष्ट होते आणि मनात जी काही इच्छा असते, ती सर्व संतोषी मातेच्या कृपेने पूर्ण होते. मग तीने  तिला उपवासाची पद्धत विचारली.ती भक्त स्त्री म्हणाली- आपल्या ऐपतीप्रमाणे काही पैशांचा  (चणे ) हरभरा गूळ घ्यावा ,तुमच्या सोयीनुसार घ्या. त्रास न होता आणि विश्वासाने आणि प्रेमाने जे काही मिळेल ते घ्या. दर शुक्रवारी व्रतस्थ राहून कथा ऐकावी, त्यातील क्रम तोडू नये, घरातील कोणीही आंबट पदार्थ खाऊ नयेत,हे नियम सतत पालन करावे, कोणी ऐकायला न मिळाल्यास समोर  दिवा लावावा  कथा सांगावी. समोर पाण्याचे कलश ठेवावे  असे व्रत करावे.माता संतोषीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशावर एक वाटी आणि त्यात गूळ आणि हरभरा ठेवा. आईसमोर तुपाचा दिवा लावावा.मातेला अक्षत, फुले, सुवासिक गंध, नारळ, लाल वस्त्र किंवा चुनरी अर्पण करा.माता संतोषीला गूळ आणि हरभरा अर्पण करा.संतोषी माता की जय म्हणत आईच्या कथेची सुरुवात करा.

तीन महिन्यांत देवी  फळ पूर्ण करते. एखाद्याचे ग्रह अशुभ असले तरी  देवी वर्षभरात कार्य सिद्ध करते, फळ सिद्ध झाले तर उद्यानपण करावे, मध्ये नाही. उद्यापनात   खीर व हरभऱ्याची भाजी तयार करावी,आठ पोरांना खायला घालावे,  मिळतील तितके नातलग, शेजाऱ्यांना बोलावून  त्यांना यथाशक्ती भोजन द्या, दक्षिणा द्या हा मातेचा नियम पूर्ण करा. त्या दिवशी घरातील कोणीही आंबट पदार्थ खाऊ नयेत. हे ऐकून त्या वृद्ध महिलेच्या सातव्या मूलाची सून निघून गेली.

वाटेत तीनं लाकडाचा गठ्ठा (मोळी)विकून  आणि त्या पैशातून गूळ आणि हरभरा घेऊन देवीच्या  व्रताची तयारी केली आणि पुढे गेल्यावर समोर मंदिर पाहून विचारले – हे मंदिर कोणाचे आहे?

तेथे संतोषी मातेचे मंदिर आहे असे सर्वजण म्हणू लागले, हे ऐकून ती मातेच्या मंदिरात गेली आणि त्यांच्या पाया पडू लागली.

नम्र प्रार्थना करू लागली - माता संतोषी,  मी पूर्णपणे अज्ञानी आहे, मला उपवासाचे कोणतेही नियम माहित नाहीत, मी दुःखी आहे. हे आई! जगाच्या माते, माझे दु:ख दूर करून  आश्रयाला घे.

देवीला  दया आली - एक शुक्रवार गेला की दुसऱ्या दिवशी पतीचे पत्र आले आणि तिसऱ्या शुक्रवारी त्यानं पाठवलेले पैसे आले. हे बघून घरात चर्चा होवू लागली.

पोरांनी टोमणे मारायला सुरुवात केली - काकींकडे पत्रे येऊ लागली, पैसे येऊ लागले, आता काकूंची मजाच.

ती सांगू लागली की  हे आपल्या सर्वांच्या साठी आहेत आणि  डोळ्यात अश्रू घेऊन मातेच्या मंदिरात   मातेश्वरी संतोषी च्या पाया पडून रडू लागली. माते, मी तुला कधी पैसे मागितले?

मी पैशाचे काय करू? मी माझ्या  स्वामींचे दर्शन मागते तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली- जा बेटी, तुझा पती येईल.

हे ऐकून ती खुश होऊन घरच्या कामाला गेली. आता संतोषी देवी विचार करू लागली, मी या निरागस मुलीला सांगितले आहे की तुझा नवरा येणार. पण कसा? त्याला स्वप्नातही आठवण नाही हीची. आठवण करून देण्यासाठी मला जावे लागेल. अशाप्रकारे देवी आपल्या दिव्य शक्ती द्वारे  त्या वृद्ध महिलेच्या सातव्या मूलाकडं गेली आणि त्याला स्वप्नात दिसली आणि म्हणू लागली - सावकाराच्या मुला, तू झोपला  आहे की जागा आहे.

तो म्हणू लागला- माते,मला झोपही येत नाही, मला जाग येत नाही, बोल काय  करू?

देवी म्हणू लागली- तुझ्या घरात कोणी  आहे की नाही,तुझं? 

तो म्हणाला - माझ्याकडे सर्व काही आहे, माझे आई-वडील,पत्नी  काय कमी आहे.

आई म्हणाली - निष्पाप मुला, तुझ्या पत्नीला  खूप त्रास होतोय, तुझे आईनातलग तिला त्रास देत आहेत. ती तुझ्यासाठी तळमळत आहे, तू तिची काळजी घे.

तो म्हणाला- हो माते, मला हे माहित आहे, पण मी कसे जाऊ? परदेशाची गोष्ट आहे, व्यवहाराचा हिशेब नाही, जायला मार्ग दिसत नाही, मी कसा जाऊ?

देवी म्हणू लागली- ऐक, सकाळी आंघोळ करून संतोषी मातेचे नाव घे,  तुपाचा दिवा लाव आणि दुकानात जा, अचानक सर्व व्यवहार सुरळीत होतील, ठेवींचा माल विकला जाईल, सायंकाळपर्यंत पैशांचा मोठा ढीग लागेल. आता  त्यानंतर देवीचा शब्द  पाळत आंघोळ करून दुकानात जाऊन संतोषी मातेची पूजा करण्यासाठी दिवा लावला. काही वेळाने देणारे पैसे आणू लागले, घेणारे हिशोब घेऊ लागले. कोठडीत भरलेल्या मालाची खरेदी करणाऱ्यांनी रोख रक्कम देऊन सौदेबाजी सुरू केली. संध्याकाळपर्यंत पैशांचा मोठा ढीग होता. मनात संतोषी मातेचं नाव घेताना चमत्कार पाहून आनंद झाला, घरी नेण्यासाठी दागिने, कापडाच्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. येथील काम संपवून तो  तात्काळ घराकडे निघाला .

इकडे, त्याची पत्नी लाकूड घेण्यासाठी जंगलात जाते, परत येताना आईच्या मंदिरात विसावते ,त्या ठिकाणी उडणारी धूळ पाहून आईला विचारते- हे आई! ही धूळ का उडते आहे?

आई म्हणते - मुली, तुझा नवरा येणार आहे. आता तु असं  कर  लाकडाचे तीन मोळ्या कर, एक नदीच्या काठावर आणि दुसरी माझ्या मंदिरावर आणि तिसरी डोक्यावर ठेव.

तुझ्या नवर्‍याला लाकडाचा गठ्ठा पाहून मोह होईल, तो इथेच थांबेल, नाश्ता पाणी करून तो त्याच्या  आईला भेटायला जाईल, मग तू लाकडाची मोळी  घेऊन जा आणि चौकात गठ्ठा टाकून जोरजोरात आवाज कर. सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, चाळणाची  भाकर द्या, नारळाच्या करवंटीतून  पाणी द्या, आज पाहुणे म्हणून कोण आले आहे? देवी ला खूप छान म्हणत तिने आनंदी मनाने लाकडाचे तीन गठ्ठे  केले. एक नदीच्या काठावर आणि एक माताजीच्या मंदिरात.तेवढ्यात प्रवासी नवरा आला. सुकलेली लाकूड पाहून त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण त्यावर विसावा घ्यावा आणि जेवण बनवून ते  गावी जावे. त्यानं थांबून जेवण केले, विश्रांती घेऊन गावाकडे निघाला, त्याचवेळी डोक्यावर लाकडाचा गठ्ठा घेऊन ती घाईघाईने येते. अंगणात लाकडाचा जड गठ्ठा टाकून तीन जोरात आवाज दिले - सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, चाळणाची  भाकर द्या, नारळाच्या करवंटीतून  पाणी द्या, आज पाहुणे म्हणून कोण आले आहे? 

हे ऐकून तिची सासू बाहेर येते आणि तिला दिलेला त्रास मुलाला न सांगण्यासाठी विनंती करते– सूनबाई  असे का म्हणते?पहा तुझा पती आला आहे,ये बस, गोड भात खा, अन्न खा, कपडे, दागिने घाल. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर येतो. अंगठी पाहून तो अस्वस्थ होतो.

आईला विचारतो- आई ही कोण आहे?

आई म्हणाली- बेटा, ही तुझी पत्नी आहे. तू गेल्यापासून गावभर भटकती. ती घरातली कोणतीही कामे करत नाही, ती चार वेळा येऊन जाते.

तो म्हणाला- ठीक आहे आई, हे मी पण पाहिलं आणि तू पण, आता दुसऱ्या घराची चावी दे, मी त्यात राहीन.

आई म्हणाली - ठीक आहे, तुझी इच्छा आहे. त्यानंतर दुसऱ्या घरातील तिसऱ्या मजल्यावरची खोली उघडून सर्व वस्तू जमा केल्या. एका दिवसात ते एखाद्या राजाच्या महालासारखे झाले. मग काय उरले होते?  आनंद झाला  ,मग शुक्रवार आला.

तिने पतीला सांगितले – मला संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन  करायचे आहे.

नवरा म्हणाला - आनंदाने कर. तिने उद्यापनाची तयारी सुरू केली. ती भावजयांच्या पोरांकडे जेवनाचं आमंत्रण देवून  आली त्यांनी होकार दिला, पण मागून भावजयांनी त्यांच्या  मुलांना शिकवलं, बघा, जेवण करताना आंबट चिंचा आवळे खाण्याचा हट्ट करा, म्हणजे तिचं उद्यापन पूर्ण होऊ नये.पोरांनी जेवणं केली, खीर खाल्ली, पण खाल्ल्यावर ते म्हणू लागले- आंबट द्या, आम्हाला खीर खायला आवडत नाही, बघायला नकोसा वाटतो.

ती म्हणू लागली - बाळांनो, आंबट कोणाला देणार नाही. हा संतोषी मातेचा प्रसाद आहे.

पोरं उभी राहिली, म्हणाली - पैसे आणा, निरागस सुनेला काही कळलं नाही, पैसे दिले.त्याचवेळी पोरांनी जिद्दीने चिंच आवळे आंबट खायला सुरुवात केली. हे पाहून संतोषी मातेला  राग आला. राजाचे दूत तिच्या पतीला घेऊन गेले. दीरभावजया हवं ते शब्द बोलू लागले. लूटमार करून पैसे आणले आहेत, आता तुरुंगात  हे सगळं कळेल. -

ती रडत रडत माताजीच्या मंदिरात गेली, म्हणू लागली- आई! काय केले, आता भक्त हसवून तू परत रडायला लावतेस आहे.

आई म्हणाली - बेटी, तू उद्यापन करून माझा उपवास मोडला आहेस.

ती म्हणू लागली - आई, मी काही गुन्हा केला आहे, मी चुकून पोरांना पैसे दिले होते, मला माफ कर. मी पुन्हा  उद्यापन करिल. 

आई म्हणाली - आता चूक करू नकोस.ती म्हणते- आता काही चूक होणार नाही, आता सांग माझे पती कसे येतील?

आई म्हणाली- जा बेटी, वाटेत तुझा नवरा सापडेल. ती बाहेर गेली, वाटेत तिचा नवरा सापडला.

तिने विचारले कुठे गेला होतास?

तो म्हणू लागला की, आपण कमावलेल्या पैशाचा कर राजाने मागितला होता, तो भरायला गेलो होतो.

ती खुश झाली आणि म्हणाली ,संतोषी मातेचा विजय असो!  काही दिवसांनी पुन्हा शुक्रवार आला..

ती म्हणाली - मला पुन्हा संतोषी मातेचे उद्यापन करायचे आहे.

नवरा म्हणाला- कर, ती पून्हा भावजयांच्या पोरांना जेवणासाठी सांगण्यास गेलीपोरं जेवणाआधी म्हणू लागली – खीर नको, आंबट खायला द्या.ती म्हणाली - कोणाला आंबट देणार नाही, यायचे असेल तर या,अण  तिने लगेचच ब्राह्मणांच्या पोरांना बोलावून प्रसाद जेवण  वाढवायला  सुरुवात केली, त्यांना दक्षिणा ऐवजी एकेक फळ देऊ लागली.तीच्यावर संतोषी माता प्रसन्न झाली.

आईच्या आशीर्वादाने नवव्या महिन्यात तिला चंद्रासारखा सुंदर मुलगा झाला. मुलगा झाल्यावर ती रोज आईच्या मंदिरात जाऊ लागली.आईला वाटलं- ही रोज येते, आज हिच्या  घरी आपण स्वतः जाऊ. असा विचार करून संतोषी मातेनं भयंकर रूप धारण केले, गूळ आणि हरभऱ्याने माखलेला चेहरा, खोडासारखे ओठ, त्यावर माश्या गुन गुनत होत्या.

दारावर पाऊल ठेवताच तिची सासू घाबरून ओरडली - बघा,वाचवा मला आपल्या घरात कोणी डाकिन घूसतआहे, पोरांनो, तीला हाकलून द्या, नाहीतर ती कुणाला तरी खाईल. मुलं ओरडायला लागली , खिडकी बंद करून पळू लागली,सर्व गोंधळून सैरावैरा धावू लागले. सून आकाशकंदील बघत मांडीवर बाळाला नीजवत होती,तीने संतोषी मातेचे ते रूप ओळखले ती आनंदाने वेडी झाली आणि म्हणाली - आज माझी संतोषी माता माझ्या घरी आली आहे. ती मुलाला दूध पिण्यापासून दूर करत. पूढं झाली. यावर सासूचा राग अनावर झाला.ती म्हणाली - काय झालंय? मुलाला मारले. इतक्यात आईच्या कृपेने फक्त मुलेच दिसू लागली.

ती सातवी सून म्हणाली - सासूबाई , जिचे व्रत मी करते ती ही संतोषी माता आहे,तीची कृपा आज आपणा सर्वांना झाली आहे.सर्वांनी आईचे पाय धरले आणि विनवणी केली - हे आई! आम्ही मूर्ख आहोत, अडाणी आहोत, आम्हाला तुमच्या उपवासाची पद्धत माहित नाही, आम्ही उपवास मोडून मोठा गुन्हा केला आहे, जगत माता संतोषी,  आमचा गुन्हा माफ कर आम्हाला त्याचा पश्चात्ताप झाला आहे.संतोषी  देवी  प्रसन्न झाली. सुनेला जसं फळ दिलं त्याप्रमाणे माता संतोषी आपणा सर्वांवर प्रसन्न  व्हावी. आईने सर्वांना आशीर्वाद  द्यावा, जो मनोभावे संतोषी मातेचं व्रत  करतो त्याची इच्छा पूर्ण होते.

संतोषी मातेचा विजय असो! 


लेबल: , ,

श्री दत्तात्रेय स्तोत्र





श्री दत्तात्रेय स्तोत्र

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ 

 अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ 

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥ 

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥

 र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित । पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥

 यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च । यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥

 आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः । मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥

 भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे । जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥ 

दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च । सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥ 

जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने । जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥ 

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे । नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥ 

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले । प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥ 

अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे । विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥ 

सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण । सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥ 

शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर । यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥ 

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च । दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥ 

दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे । गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥

 शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् । सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥ 

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् । दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥ 

॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम्

    श्री दत्तात्रेय स्तोत्र हे दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे दर्शन करविणारे आहे.  हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनी रचले आहे.
     जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी सर्वरोग नाहीसे करणाऱ्या श्रीदत्तात्रेयदेवांना मी भजतो. भवरोगाची सुटका होणे कठिण ,मात्र याही रोगाचे निराकरण दत्त महाराज करतात.  ह्या श्लोकाला ध्यानमंत्र म्हटले जाते. दत्त महाराजांच्या रूपाची कल्पना ध्यानासाठी कशी करावी तर किंचित जटा, गोरेपान, हातात त्रिशूल धरलेले, आणि सर्व रोगांचा परिहार करणारे श्री दत्त महाराज. जगाची उत्पत्ती करणाऱ्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणाऱ्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या गुरूदेवा दत्तात्रेया आपणास नमस्कार असो. 

लेबल: , ,

गुरुवार, २६ मे, २०२२

तुमच्याआहारात सूकामेवा समावेश करणे हे अन्न खाण्याइतकेच महत्त्वाचे आहे कारण ते तुमचे शरीर शाबूत ठेवणारे स्नॅक्स आहेत. ते मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यात, शरीराची दुरुस्ती करण्यात मदत करतात. नट आणि सुका मेवा भरपूर प्रमाणात पोषक आणि अँटिऑक्सिडेंट असतात म्हणूनच आयुर्वेद त्यांना खाण्याची शिफारस करतो. रोज सुका मेवा खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की मधुमेह , मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या चयापचय परिस्थितीचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन. सुका मेवा विविध पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे ज्यामध्ये विविध शर्करा, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोहासारखी महत्वाची खनिजे आणि सुक्या जर्दाळू आणि पपई यांसारखी संत्रा फळे बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहेत, जे शरीराद्वारे शोषले जातात तेव्हा, व्हिटॅमिन ए बनते. नटांमध्ये प्रथिने, चरबी, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर असतात. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सुक्या फळांचा फायदा होतो कारण त्यात आहारातील फायबर मुबलक प्रमाणात असते[2]. कोणते ड्रायफ्रुट्स रोज आणि का खावेत? बदाम व्हिटॅमिन ई, अत्यावश्यक तेले आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या भरपूर आरोग्यदायी फायद्यांमुळे सामान्यतः ड्रायफ्रूटचे सेवन केले जाते जे प्रौढ आणि मुलांसाठी फायदेशीर आहे. बदाम हृदय निरोगी ठेवतात, वजन व्यवस्थापनात फायदा करतात, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. अक्रोड एकल-सीडेड, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिनेंनी भरलेले कठीण दगडासारखे; अक्रोड तणाव कमी करण्यासाठी, कर्करोग रोखण्यासाठी आणि निर्दोष त्वचा आणि केस देण्यासाठी फायदेशीर आहे. काजू चवदार चव आणि मलईदार पोत यासाठी ओळखले जाणारे काजू व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, प्रथिने आणि मॅग्नेशियमने ओतलेले असतात. काजू वजन कमी करण्यास मदत करते, खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. खारीक या कोरड्या आणि ओल्या दोन्ही असू शकतात. सुक्या खजूरमध्ये भरपूर पाचक तंतू असल्यामुळे भूक भागते. हे वजन कमी करण्यास मदत करते, हिमोग्लोबिनची पातळी वाढवते, ऊर्जा वाढवते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

शनिवार, २८ मार्च, २०२०

विक्रम बेताल कथा

विक्रम बेताल कथा 
"शरनिधि का शतरंज"
      
     अपनीही धुन का पक्का राजा विक्रम तांत्रिक के मंगवानेपर वह कलेवर लाने निकल पडा,पेडपर लटकाहूवा वह शव राजाने उतारकर अपने कंधेपर लिया और आगे चल पडा,तभी शव के भितर छिपा बेताल बोलने लगा,"राजा तूम्हे देखकर मुझे हसीही होती है,इतनी रात बितनेपर भी मेरे शव को अपने कंधोपर ढोये जा रहे हो ।थकान का नाम तक नही,पर तबभी मूझे शक होता है, यह तुम्हारा उपक्रम व्यर्थ ही जाएगा, क्योंकि कूछ लोग  कूछ क्रिडाओके बहूतही शौकीन हूवा करते है।शरनिधि भी एक शतरंज का शौकीन राजा था।

    शतरंज मके के खेल से   राजा शरनिधि को एक गंधर्व के हाथो फिरसे अपना यौवन मिलने वाला था पर उसने यह अच्छा अवसर हातोसे फीसला दिया,उसकी कहाणी तूम सून लो विक्रम राजा:
           राजा शरनिधि शतरंजका बहूतही शौकीन राजा हूवा करता था।अपने राज्य मे अनेको त्यवहारोपर राजा शतरंज की प्रतियोगिताए करवाता था।उसे खूदको तो कीतना भी माहिर शतरंज का खिलाड़ी कभी हरा न पाया था,वह हर रातके भोजनके बाद राजमहल मे शतरंजका खेल खेलता था। कभी महेमानोके साथ,तो कभी मंत्रियोके साथ और कोई न मिले तो, तो उस समय अपनी राणी प्रभावती के साथ देर रात तक शतरंजके फांसे फेंकते रहता थे।
        राणी प्रभावती साथ ही उनकी दो लडकीया वैजयंती और मेघना जो सुंदर और विवाह योग्य यूवतीया थी वे भी शतरंजमे हिस्सा लेती और चावसे खेला करतीथी।
एकदिन वह दोनो ही, राजमहलके उपवनमे पुरणिमाके दिन रातके समय शतरंज खेल रहीथी ,वैजयंतीने अच्छे फासे डालकर सामनेवाली मेघनाको हराया तभी उनके पीछेसे एक गंधर्व असली रूपसे प्रकट हूवा ।और वैजयंतीने जिस प्रकार से मेघनाको शतरंजमे हराया उसकी तारिफ करने लगा।उसे दोनो राजकूमारीया खडी हूयी,उन्होने गंधर्वसे कहा,"आप यहा तक कैसे आए,राजदरबारके उपवन को चारोऔरसे पहेरा होनेपरभी जबआप यहा आए,इसकी बडी सजा आपको मिलसकती है ",यह सूनकर गंधर्व बोले,"हे सूंदरीयो ,मै कोई मनुष्य नही मै गंधर्व हू ,मेरा नाम समिर है,आज इस पूर्णिमा के दिन मै आकाशकी सैर कर रहा था,जो मैने आप दोनोको आकाशमार्गसे शतरंज खेलते हूये देखा,शतरंजका खेल तो मेरा बहूतही प्रीय रहा है,मै अपने आपको रोक न पाया और शतरंज के खेल को देखने गुप्त रूपसे यहा उतरा हू।मेरा रथ भी मैने यह उपवनमेही उतारा है वह देखो,राजकुमारीयोने उस और देखा तो उन्हे बडाही सूंदर सूवर्ण का रथ दिखाई पडा जो बहूतही सूंदर था।राजकूमारीया आश्चर्य चकीत हूयी,तभी,गंधर्व  बोले ,"आपको अगर आपत्ति ना हो तो, मेरे साथ शतरंग खेलोगी,"वैजयंतीके हा कहनेपर खेल शूरू हूवा।दोनोने शतरंज खेलको रंगतदार बनाया आखिर कार गंधर्व से वैजयंती को हार माननी पडी। उसके बाद मेघनाभी गंधर्व के साथ शतरंज खेलने लग गयी और गंधर्व ने उसे दस चालोमे हरा दीया।दोनो राजकूमारीया गंधर्व को मिलकर बहूत खूष थी,"अगले पूर्णिमा के दिन मै फिर शतरंज खेलने आऊंगा "!,कहकर वह सूवर्ण रथपर आरूढ हूवा और देखतेही रथ आकाशकी और चला गया।

   जब राजकूमारीया महलमे आई तब उन्होंने सारा वृत्तांत अपने पिता राजा शरनिधि और माँ से कह सूनाया,जब अगली पूर्णिमा की रात होने आई तब दोनो राजकूमारीयोको उपवनमे शतरंज खेलनेको बैठाकर राजा और राणी दोनो पासवाले चमेलीलताओसे भरे वृक्ष के पिछे छिपे रहे,पहला प्रहर बिततेही वहा उपवनमे एक सूवर्ण रथ उतरा जिसमेसे वह गंधर्व समिर उतरा वह राजकूमारीयोके पास आता हूवा उस चमेलीलताओसे घीरे वृक्षके रुका जहा राजा और राणी छिपे थे,गंधर्व बोले, "शरनिधि ऐसे छिपनेकी क्या आवश्यकता है, तूम राणी समेत यहा आवो,और अगर आपत्ति ना हो तो मेरे साथ शतरंग खेल सकोगे?"तूरंतही राजाने हां कही।और वे दोनो गंधर्व के सामने आए,राजा और राणी  जिस आश्चर्य जनक बातको मनही मन सोचा करते थे वह आज प्रत्यक्षदर्शी थी।राजा शरनिधि और गंधर्व समिर एक दूसरेके सामने शतरंज खेलने चंद्रशिलाओपर बैठे तथा राणी प्रभावती और राजकूमारीया वैजयंती और मेघना भी बाजू वाली चंद्रशिलाओपर खेल देखने बैठ गयी।

  गंधर्व ,शतरंजकी गोटीयोको ठीक करते हूये बोले,"राजा देखो ,स्पर्धा कोई भी हो बाजी लगानेसेही मजा देती है!"
   राजा ने भी कहा,"हे गंधर्व शतरंजको जब आपकाही आमंत्रण है, 'तो मूझे हारना क्या होगा,'यह भी आपही कहे!मै तैयार हूँ"।
    गंधर्व ने कहा,"ठीक फिर मै हार जाउ तो ,तुम्हारी इस अधेड उमर मे फिर तूम्हे मेरी गंधर्व महीमासे युवक बना दुंगा जिससे तूम्हे दोबारा अपनी जवानी जीने मौका इस जीवनमे मिलेगा"।
    "और अगर मै जित जाऊ,तो तूम्हे इन दो राजकूमारीयोमेसे एक के साथ मेरा विवाह करवाना होगा"
     राजाने सोच लिया,दोनो तरफसे अपनाही फायदा होगा,हारे तो किसीको नसीब न होनेवाला दामाद मिलेगा,और जित जावू तो फिरसे जवानी प्राप्त होगी,यह सोच राजाने हां कह दिया।
    राणी सोचमे डूब गयी की जब राजा युवक बनेंगे तो उनकी अपने आपही दूर्दशा होतीही रहेंगी,राजा तो नई शादीभी रचाएंगे,जिसका कोई इलाज न कर सकेगा
    राजकूमारीया गंधर्व से, पाणिग्रहन को एक दूसरीसे अधिक सूंदर और योग्य समझने लग गयी
    खेल भी शूरू हूवा, इतनेमे वहा एक और रथ आकाशमार्गसे आकर उपवनमे उतरा जिसमेसे एक सूंदर औरत निकलकर वहा आयी जहा शतरंज की बाजी शूरू थीउसने राजा को देखते हूये कहा कि," मै इस गंधर्व समिर की पत्नी हू ,मै देखने आई हू काई ऐसी कोणसी सूंदरी जमीन पर जन्मी है जिसके सौदर्य पर मोहित होकर यह गंधर्व शादी रचानेकी लालसा लिए यहा वहा घूमता फिर रहा है ।"
     देखतेही देखते राजाने आखिर कार गंधर्व को हरा दीया ।अब बाजी हारेहूये गंधर्व ने कहा,राजा शरनिधि मै हारा हू और तूम बाजी जीत गये हो तब तूम्हे मै अपनी महिमा शक्ति से तूम्हे युवक कर देता हू,जैसेही वह गंधर्व अपने मंत्र बोलने लग गया तभी  राजा शरनिधि ने युवक अवस्था लेनेको साफ इनकार कर दिया।
    यह कहानी सूनाकर बेतालने राजा विक्रमादित्य से कहा,"बोलो राजा,उस शरनिधि राजाकी मूर्खता को तूम क्या कहोगे,हात मे आया यौवन मिलनेका मौका उसने गवाया,शतरंजकी बाजीने उसे बहूत कुछ दिया,दोनो ही तरफसे चाहे हार हो या जीत पर अब उसने यौवन लेनेको इंनकार करके कोणसी संदिग्धता दिखाई?
  "मेरे प्रश्न का उत्तर दो विक्रमादित्य, वरना तुम्हारे सिरके तूकडे-तूकडे हो जाएंगे? "

     बेतालकी शंकाए पहचानकर विक्रमादित्य बोला,"जरूर ही राजा  शरनिधि मानव सहज दुर्बलता का शिकार हूवा,दोनोही तरफ के फायदोको देखकर अगर वह हारता,तो ,अपनी लडकीकी शादी गंधर्व से करवाकर पछताता क्योंकि गंधर्व का भेद गंधर्व पत्नी ने राजा शरनिधि को खोल दिया था।"
     "वह जित गया,उसने यौवन लेनेको इनकार किया,यह उसने अपनी राणी प्रभावती के मन की बात ताड ली,राणी का क्या होता,वह दो राजपूत्रीया वैजयंती और मेघना अपने पिता को युवक होता देख क्या  महसूस करती? उनका भविष्य और शादी यह बातो को क्या  अडचने आती?"
       यह सूनकर बेताल झपटसे उडकर ,विक्रमादित्य के कंधोपरसे फिर उसी पेढपर जा लटका,जहा से विक्रमादित्य ने लाया था।

लेबल: , , , ,