सोमवार, २० जून, २०२२

श्री नवनाथ स्तोत्र

         ।श्रीनवनाथस्तोत्र

जय जयाजी गणधिपा , ॐ कराच्या सगुण स्वरोपा ॥ प्रथम नमुनी तुला बाप्पा ॥ माय सरस्वती वंदितो॥ १॥ 

 आ ता वंदन श्री गुरुनाथा ॥ दत्तात्रेय स्वामी समर्थ ॥ तुझिया चरनी ठेविला माथा ॥ स्फुर्थी दया नाथ कथा वर्णाया॥ २॥

 तुम्ही गुरु नवनाथांचे चरण धरिले मी तुमचे॥ लले पुरवा बालकाचे ॥ वाव्हे स्थिर हृदयी माझ्या ॥ ३॥ 

 तुमच्या दिव्या चरनांचे ध्यान॥ मी करितो ध्यान म्हणुनी वस्ति येउन ॥ अंतरी माझ्या करावी ॥ ४॥ 

 ही तुमचीच आहे इच्छा ॥ म्हणुनी जाहली मनीषा ॥ नाथ प्रताप दिव्या भाषा ॥ कवन रुपे गावी वाटे ॥ ५॥

 मर्त्य लोकी कलि येता॥ धर्मं बुडाला सवर्था ॥ त्या वेळी गुरु नाथ ॥ घेवून आलात नाथाना॥ ६॥

 प्रथम तो जहाला तो मछिन्द्रनाथ ॥ याचा जन्म मछली च्या उदरात॥ म्हणुनी नाम पावला तेच सत्य ॥ कलियुगी आले कवि नारायण ॥ ७॥ 

 दूसरा तो जहाला जालंदरनाथ ॥ हा अंतरिक्ष नाथ नारायण समर्थ ॥ बरुहा द्रव राजाच्या यदन्न कुंडात॥ प्रगत झाला स्वामी माझा ॥ ८॥ 

 तीसरा तो नागनाथ ॥ जन्म पावला नागिनिच्या उदरात ॥ हा अविर्होत्र नारायण समर्थ । धर्मं रक्षान्या प्रगटलासे ॥ ९॥ 

 चौथा तो रेवंनाथ ॥ चमस नारायण सिद्ध समर्थ ॥ त्याचाच हा अवतार सत्य ॥ मृत्यु लोकी प्र गट ला से ॥ १०॥

 पाचवा तो गोरक्ष नाथ ॥ हा प्र गट ला उकिरडयात ॥ हरी नारायण अवतार सत्य ॥ महा समर्थ सिद्ध योगी॥ ११॥

 पिप्पा ला यण नारायण समर्थ ॥ सहाव्या अवतारी प्र गट ला ॥ नाम धरिले चर्पतिनाथ ॥ तारावया भाविकांना॥ १२॥

 सातव्या अवतारी द्रमिल नारायण ॥ भरतुहारी म्हणुन ॥ आले अवतार धरून ॥ आद्न्या श्री हरीची म्हानुनिया ॥ १३॥

 आठवा अवतार कानिफनाथ ॥ हा प्रबुद्ध नारायण समर्थ ॥ जन्म ला से गज कर्नात॥ सिद्ध योगी समर्थ हा ॥ १४॥ 

 नवव्या अवतारी गहिनीनाथ ॥ कर्भंजन नारायण समर्थ ॥ मातीच्या पुतल्यात झाले प्रगट ॥ संजीवनी मंत्र जपता गोरक्षाने ॥ १५॥ 

 ऐसे अस्ति नव नारायण ॥ अयोनि सम्भव यांचा जन्म ॥ यांची किमया जानन्या कोण ॥ समर्थ असे या धरेवरी॥ १६॥ 

 असे नवनाथांचा भरी दरार ॥ काल कापे थरथरा ॥ देव दनावंचाही पारा ॥ उतरवला क्षणात नाथानी॥ १७॥ 

 जो जो नित्य करील पठान ॥ दिव्य नवनाथांचे स्मरण ॥ त्याचे नासेल सारे दैन्य ॥ संसारी सुखी होइल तो ॥ १८॥

लेबल: , , ,

बुधवार, ८ जून, २०२२

कानिफनाथ आरती


जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।

पतिपावना ओवळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

ऋषभपुत्र श्रीप्रभुध्द नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजस्वती ।।

नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रितवरुनी केली तपपूर्ती ।।

नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवुनि मिळवी वरप्राप्ती ।।

गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसुनि रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।

सुवर्णामुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।

सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथ तुमची ।।

गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळिती होऊनी हर्षभरी ।।

चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बीद्रावळी गजरी ।।

सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।

नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामधे मच्छिंद्रनाथे परिक्षिले समयी ।।

प्रेमे गोपीचंद रक्षिला असुनी अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।

जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तरली ।।

अवनी भ्रमुनि निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापुनि स्वानंदाने मढी पावन केली ।।

समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।

गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंदी झाला लीन चरणी ।।

लेबल: , , , ,

शनिवार, २८ मे, २०२२

श्री दत्तात्रेय स्तोत्र





श्री दत्तात्रेय स्तोत्र

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ 

 अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ 

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥ 

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥

 र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित । पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥

 यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च । यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥

 आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः । मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥

 भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे । जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥ 

दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च । सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥ 

जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने । जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥ 

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे । नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥ 

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले । प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥ 

अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे । विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥ 

सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण । सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥ 

शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर । यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥ 

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च । दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥ 

दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे । गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥

 शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् । सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥ 

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् । दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥ 

॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम्

    श्री दत्तात्रेय स्तोत्र हे दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे दर्शन करविणारे आहे.  हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनी रचले आहे.
     जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी सर्वरोग नाहीसे करणाऱ्या श्रीदत्तात्रेयदेवांना मी भजतो. भवरोगाची सुटका होणे कठिण ,मात्र याही रोगाचे निराकरण दत्त महाराज करतात.  ह्या श्लोकाला ध्यानमंत्र म्हटले जाते. दत्त महाराजांच्या रूपाची कल्पना ध्यानासाठी कशी करावी तर किंचित जटा, गोरेपान, हातात त्रिशूल धरलेले, आणि सर्व रोगांचा परिहार करणारे श्री दत्त महाराज. जगाची उत्पत्ती करणाऱ्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणाऱ्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या गुरूदेवा दत्तात्रेया आपणास नमस्कार असो. 

लेबल: , ,