सोमवार, २० जून, २०२२

श्री नवनाथ स्तोत्र

         ।श्रीनवनाथस्तोत्र

जय जयाजी गणधिपा , ॐ कराच्या सगुण स्वरोपा ॥ प्रथम नमुनी तुला बाप्पा ॥ माय सरस्वती वंदितो॥ १॥ 

 आ ता वंदन श्री गुरुनाथा ॥ दत्तात्रेय स्वामी समर्थ ॥ तुझिया चरनी ठेविला माथा ॥ स्फुर्थी दया नाथ कथा वर्णाया॥ २॥

 तुम्ही गुरु नवनाथांचे चरण धरिले मी तुमचे॥ लले पुरवा बालकाचे ॥ वाव्हे स्थिर हृदयी माझ्या ॥ ३॥ 

 तुमच्या दिव्या चरनांचे ध्यान॥ मी करितो ध्यान म्हणुनी वस्ति येउन ॥ अंतरी माझ्या करावी ॥ ४॥ 

 ही तुमचीच आहे इच्छा ॥ म्हणुनी जाहली मनीषा ॥ नाथ प्रताप दिव्या भाषा ॥ कवन रुपे गावी वाटे ॥ ५॥

 मर्त्य लोकी कलि येता॥ धर्मं बुडाला सवर्था ॥ त्या वेळी गुरु नाथ ॥ घेवून आलात नाथाना॥ ६॥

 प्रथम तो जहाला तो मछिन्द्रनाथ ॥ याचा जन्म मछली च्या उदरात॥ म्हणुनी नाम पावला तेच सत्य ॥ कलियुगी आले कवि नारायण ॥ ७॥ 

 दूसरा तो जहाला जालंदरनाथ ॥ हा अंतरिक्ष नाथ नारायण समर्थ ॥ बरुहा द्रव राजाच्या यदन्न कुंडात॥ प्रगत झाला स्वामी माझा ॥ ८॥ 

 तीसरा तो नागनाथ ॥ जन्म पावला नागिनिच्या उदरात ॥ हा अविर्होत्र नारायण समर्थ । धर्मं रक्षान्या प्रगटलासे ॥ ९॥ 

 चौथा तो रेवंनाथ ॥ चमस नारायण सिद्ध समर्थ ॥ त्याचाच हा अवतार सत्य ॥ मृत्यु लोकी प्र गट ला से ॥ १०॥

 पाचवा तो गोरक्ष नाथ ॥ हा प्र गट ला उकिरडयात ॥ हरी नारायण अवतार सत्य ॥ महा समर्थ सिद्ध योगी॥ ११॥

 पिप्पा ला यण नारायण समर्थ ॥ सहाव्या अवतारी प्र गट ला ॥ नाम धरिले चर्पतिनाथ ॥ तारावया भाविकांना॥ १२॥

 सातव्या अवतारी द्रमिल नारायण ॥ भरतुहारी म्हणुन ॥ आले अवतार धरून ॥ आद्न्या श्री हरीची म्हानुनिया ॥ १३॥

 आठवा अवतार कानिफनाथ ॥ हा प्रबुद्ध नारायण समर्थ ॥ जन्म ला से गज कर्नात॥ सिद्ध योगी समर्थ हा ॥ १४॥ 

 नवव्या अवतारी गहिनीनाथ ॥ कर्भंजन नारायण समर्थ ॥ मातीच्या पुतल्यात झाले प्रगट ॥ संजीवनी मंत्र जपता गोरक्षाने ॥ १५॥ 

 ऐसे अस्ति नव नारायण ॥ अयोनि सम्भव यांचा जन्म ॥ यांची किमया जानन्या कोण ॥ समर्थ असे या धरेवरी॥ १६॥ 

 असे नवनाथांचा भरी दरार ॥ काल कापे थरथरा ॥ देव दनावंचाही पारा ॥ उतरवला क्षणात नाथानी॥ १७॥ 

 जो जो नित्य करील पठान ॥ दिव्य नवनाथांचे स्मरण ॥ त्याचे नासेल सारे दैन्य ॥ संसारी सुखी होइल तो ॥ १८॥

लेबल: , , ,

बुधवार, ८ जून, २०२२

कानिफनाथ आरती


जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।

पतिपावना ओवळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

ऋषभपुत्र श्रीप्रभुध्द नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजस्वती ।।

नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रितवरुनी केली तपपूर्ती ।।

नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवुनि मिळवी वरप्राप्ती ।।

गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसुनि रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।

सुवर्णामुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।

सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथ तुमची ।।

गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळिती होऊनी हर्षभरी ।।

चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बीद्रावळी गजरी ।।

सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।

नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामधे मच्छिंद्रनाथे परिक्षिले समयी ।।

प्रेमे गोपीचंद रक्षिला असुनी अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।

जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तरली ।।

अवनी भ्रमुनि निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापुनि स्वानंदाने मढी पावन केली ।।

समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।

गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंदी झाला लीन चरणी ।।

लेबल: , , , ,