शनिवार, २८ मे, २०२२

संतोषी माता व्रत कथा मराठी

माता संतोषी प्रतिमा 

 शुक्रवार संतोषी माता व्रत कथा

संतोषी माता व्रत कथा-

एक वृद्ध स्त्री होती, तिला सात मुलं होते. सहा कामाला जाणारे कमाई करणारे होते तर एक घरीच असायचा. म्हातारी बाई स्वयंपाक करायची,काम करणाऱ्या  सहा मुलांसाठी अन्न पुरवायची आणि जे काही  त्यांच्या ताटातील शिल्लक  उरले ते सातव्या मुलाला खायला द्यायची.

एके दिवशी तो सातवा मूलगा त्याच्या पत्नीस लाडाने  म्हणाला- बघ माझ्या आईचे माझ्यावर खूपच प्रेम आहे ती किती प्रेमाने स्वयंपाक करून मला जेवू घालते.

त्याची पत्नी म्हणाली- का नाही, सगळ्या भावांचे शिल्लक राहीलेलं जे तूम्हाला खायला घालते ना तुमची आई.

तो म्हणाला - असे होऊ शकत नाही. जोपर्यंत मी ते माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसनारच नाही.

सून हसली आणि म्हणाली - बघितले तरच विश्वास बसेल.

काही दिवसांनी सण आला. घरात सात प्रकारचे अन्न आणि  लाडू तयार केल्या  गेले,गंमत पहाण्यासाठी  डोके दुखत असल्याच्या बहाण्याने सातवा मूलगा डोक्यावर पातळ कपडा घालून स्वयंपाकघरातच झोपला. तो कपड्यांमधून बघत राहिला. सहा भाऊ जेवायला आले. त्याने पाहिले की आईने त्यांच्यासाठी  सुंदर आसनं घातले, विविध प्रकारचे स्वयंपाक व लाडू वाढले आणि त्यांना विनंती करून वाढले. तो बघतच राहिला.

जेवण झाल्यावर सहाजण उठल्यावर आईने त्यांच्या  ताटातून राहिलेल्या लाडूचे तुकडे(भूगा) उचलून एकच मोठा लाडू बनवला.

साफ सफाई  झाल्यावर वृद्ध आईने झोपलेल्या  सातव्या मूलाला हाक मारली - बेटा, सहा भावांनी जेवले, आता तू एकटाच राहिलास, कधी उठणार.

तो म्हणू लागला – आई, मला खायला वैगरे काही नको, मी आता परदेशात (दूर शहरात) निघून जातो.

आई म्हणाली - उद्या जातो तर तू आजच निघून जा.

तो म्हणाला- हो मी आजच जात आहे. असे बोलून तो रागानं घरातून निघून गेला.

निघण्याच्या वेळी  बायकोची आठवण झाली. ती गोठ्यात शेणाच्या गोवऱ्या थापत होती.

तिथे जाऊन तो म्हणाला, 

मी परदेशात (शहरात)जातोय आणि तिकडेच मेहनत करून पोट भरिल  ,तु मी येथे येई पर्यंत येथेच रहा तूला भेटायला मी  स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर नक्कीच येईन.

त्याची पत्नी म्हणाली -आनंदाने जा माझा विचार करू नका,मी तूमच्या  आठवणीं वरच तूमची वाट बघेन, देव तुम्हाला मदत करेल.त्यानं आठवण म्हणून आपल्या हाताच्या बोटातील अंगठी तीला दिली,

ती म्हणाली - माझ्याकडे तर आठवण म्हणून द्यायला काय आहे, हा शेणाने भरलेला हात आहे. असे म्हणत शेणाचा हात त्याच्या पाठीवर मारला. तो निघून गेला, चालत चालत  ,मजल दर मजल करता काही दिवसांत दूरच्या देशात (शहरात)पोहोचला.एका सावकाराचे दुकान होते. तो तिथे गेला आणि म्हणाला - सेठ, मला कामावर ठेवा.सावकाराला नोकराची गरज होती, 

परंतू - काम पाहून तुला पगार  मिळेल असं सांगून  त्याला सावकाराची नोकरी लागली, तो सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नोकरी करू लागला. काही दिवसात दुकानाचे सर्व व्यवहार, हिशेब, ग्राहकांना वस्तू विकणे ही सर्व कामे करू लागला. सावकाराचे सात-आठ नोकर होते, सगळ्यांना याचं चोख काम पाहून चक्कर यायला लागली,कारण तो खूप हुशार झाला.सेठनेही त्याचं काम पाहिले आणि त्याला तीन महिन्यांत अर्ध्या नफ्याचे हिस्सेदार  बनवले. तो काही वर्षातच एक प्रसिद्ध सेठ बनला आणि मालकाने संपूर्ण व्यवसाय त्याच्यावर सोडला.

इकडे  त्याची आई त्याच्या   बायकोला त्रास देऊ लागली, घरची सगळी कामं करून तिला सरपण लाकडे आणायला जंगलात पाठवी,  घरच्या पिठातून निघालेली चाळणाची भाकरी  व नारळाच्या  करवंटीतून  पाणी ठेवून,  नको ते बोल बोलू लागली . सूनही नशीबापूढं हतबल होती,नवर्‍याची येण्याची वाट पाही .ती एकदा लाकडे आणायला निघाली होती, वाटेत अनेक महिला संतोषी मातेचे व्रत करताना तिला दिसल्या.

ती कथा ऐकत तिथे उभी राहिली आणि तिने विचारले - बहिणींनो, तुम्ही कोणत्या देवाचं व्रत करता आणि त्याचे काय फळ मिळते. जर तुम्ही मला या व्रताचा नियम समजावून सांगितलात तर तूमचे  उपकार होतील .

तेव्हा एक महिला म्हणाली - ऐका, हे संतोषी मातेचे व्रत आहे. असे केल्याने , दारिद्र्य नष्ट होते आणि मनात जी काही इच्छा असते, ती सर्व संतोषी मातेच्या कृपेने पूर्ण होते. मग तीने  तिला उपवासाची पद्धत विचारली.ती भक्त स्त्री म्हणाली- आपल्या ऐपतीप्रमाणे काही पैशांचा  (चणे ) हरभरा गूळ घ्यावा ,तुमच्या सोयीनुसार घ्या. त्रास न होता आणि विश्वासाने आणि प्रेमाने जे काही मिळेल ते घ्या. दर शुक्रवारी व्रतस्थ राहून कथा ऐकावी, त्यातील क्रम तोडू नये, घरातील कोणीही आंबट पदार्थ खाऊ नयेत,हे नियम सतत पालन करावे, कोणी ऐकायला न मिळाल्यास समोर  दिवा लावावा  कथा सांगावी. समोर पाण्याचे कलश ठेवावे  असे व्रत करावे.माता संतोषीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशावर एक वाटी आणि त्यात गूळ आणि हरभरा ठेवा. आईसमोर तुपाचा दिवा लावावा.मातेला अक्षत, फुले, सुवासिक गंध, नारळ, लाल वस्त्र किंवा चुनरी अर्पण करा.माता संतोषीला गूळ आणि हरभरा अर्पण करा.संतोषी माता की जय म्हणत आईच्या कथेची सुरुवात करा.

तीन महिन्यांत देवी  फळ पूर्ण करते. एखाद्याचे ग्रह अशुभ असले तरी  देवी वर्षभरात कार्य सिद्ध करते, फळ सिद्ध झाले तर उद्यानपण करावे, मध्ये नाही. उद्यापनात   खीर व हरभऱ्याची भाजी तयार करावी,आठ पोरांना खायला घालावे,  मिळतील तितके नातलग, शेजाऱ्यांना बोलावून  त्यांना यथाशक्ती भोजन द्या, दक्षिणा द्या हा मातेचा नियम पूर्ण करा. त्या दिवशी घरातील कोणीही आंबट पदार्थ खाऊ नयेत. हे ऐकून त्या वृद्ध महिलेच्या सातव्या मूलाची सून निघून गेली.

वाटेत तीनं लाकडाचा गठ्ठा (मोळी)विकून  आणि त्या पैशातून गूळ आणि हरभरा घेऊन देवीच्या  व्रताची तयारी केली आणि पुढे गेल्यावर समोर मंदिर पाहून विचारले – हे मंदिर कोणाचे आहे?

तेथे संतोषी मातेचे मंदिर आहे असे सर्वजण म्हणू लागले, हे ऐकून ती मातेच्या मंदिरात गेली आणि त्यांच्या पाया पडू लागली.

नम्र प्रार्थना करू लागली - माता संतोषी,  मी पूर्णपणे अज्ञानी आहे, मला उपवासाचे कोणतेही नियम माहित नाहीत, मी दुःखी आहे. हे आई! जगाच्या माते, माझे दु:ख दूर करून  आश्रयाला घे.

देवीला  दया आली - एक शुक्रवार गेला की दुसऱ्या दिवशी पतीचे पत्र आले आणि तिसऱ्या शुक्रवारी त्यानं पाठवलेले पैसे आले. हे बघून घरात चर्चा होवू लागली.

पोरांनी टोमणे मारायला सुरुवात केली - काकींकडे पत्रे येऊ लागली, पैसे येऊ लागले, आता काकूंची मजाच.

ती सांगू लागली की  हे आपल्या सर्वांच्या साठी आहेत आणि  डोळ्यात अश्रू घेऊन मातेच्या मंदिरात   मातेश्वरी संतोषी च्या पाया पडून रडू लागली. माते, मी तुला कधी पैसे मागितले?

मी पैशाचे काय करू? मी माझ्या  स्वामींचे दर्शन मागते तेव्हा देवी प्रसन्न होऊन म्हणाली- जा बेटी, तुझा पती येईल.

हे ऐकून ती खुश होऊन घरच्या कामाला गेली. आता संतोषी देवी विचार करू लागली, मी या निरागस मुलीला सांगितले आहे की तुझा नवरा येणार. पण कसा? त्याला स्वप्नातही आठवण नाही हीची. आठवण करून देण्यासाठी मला जावे लागेल. अशाप्रकारे देवी आपल्या दिव्य शक्ती द्वारे  त्या वृद्ध महिलेच्या सातव्या मूलाकडं गेली आणि त्याला स्वप्नात दिसली आणि म्हणू लागली - सावकाराच्या मुला, तू झोपला  आहे की जागा आहे.

तो म्हणू लागला- माते,मला झोपही येत नाही, मला जाग येत नाही, बोल काय  करू?

देवी म्हणू लागली- तुझ्या घरात कोणी  आहे की नाही,तुझं? 

तो म्हणाला - माझ्याकडे सर्व काही आहे, माझे आई-वडील,पत्नी  काय कमी आहे.

आई म्हणाली - निष्पाप मुला, तुझ्या पत्नीला  खूप त्रास होतोय, तुझे आईनातलग तिला त्रास देत आहेत. ती तुझ्यासाठी तळमळत आहे, तू तिची काळजी घे.

तो म्हणाला- हो माते, मला हे माहित आहे, पण मी कसे जाऊ? परदेशाची गोष्ट आहे, व्यवहाराचा हिशेब नाही, जायला मार्ग दिसत नाही, मी कसा जाऊ?

देवी म्हणू लागली- ऐक, सकाळी आंघोळ करून संतोषी मातेचे नाव घे,  तुपाचा दिवा लाव आणि दुकानात जा, अचानक सर्व व्यवहार सुरळीत होतील, ठेवींचा माल विकला जाईल, सायंकाळपर्यंत पैशांचा मोठा ढीग लागेल. आता  त्यानंतर देवीचा शब्द  पाळत आंघोळ करून दुकानात जाऊन संतोषी मातेची पूजा करण्यासाठी दिवा लावला. काही वेळाने देणारे पैसे आणू लागले, घेणारे हिशोब घेऊ लागले. कोठडीत भरलेल्या मालाची खरेदी करणाऱ्यांनी रोख रक्कम देऊन सौदेबाजी सुरू केली. संध्याकाळपर्यंत पैशांचा मोठा ढीग होता. मनात संतोषी मातेचं नाव घेताना चमत्कार पाहून आनंद झाला, घरी नेण्यासाठी दागिने, कापडाच्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. येथील काम संपवून तो  तात्काळ घराकडे निघाला .

इकडे, त्याची पत्नी लाकूड घेण्यासाठी जंगलात जाते, परत येताना आईच्या मंदिरात विसावते ,त्या ठिकाणी उडणारी धूळ पाहून आईला विचारते- हे आई! ही धूळ का उडते आहे?

आई म्हणते - मुली, तुझा नवरा येणार आहे. आता तु असं  कर  लाकडाचे तीन मोळ्या कर, एक नदीच्या काठावर आणि दुसरी माझ्या मंदिरावर आणि तिसरी डोक्यावर ठेव.

तुझ्या नवर्‍याला लाकडाचा गठ्ठा पाहून मोह होईल, तो इथेच थांबेल, नाश्ता पाणी करून तो त्याच्या  आईला भेटायला जाईल, मग तू लाकडाची मोळी  घेऊन जा आणि चौकात गठ्ठा टाकून जोरजोरात आवाज कर. सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, चाळणाची  भाकर द्या, नारळाच्या करवंटीतून  पाणी द्या, आज पाहुणे म्हणून कोण आले आहे? देवी ला खूप छान म्हणत तिने आनंदी मनाने लाकडाचे तीन गठ्ठे  केले. एक नदीच्या काठावर आणि एक माताजीच्या मंदिरात.तेवढ्यात प्रवासी नवरा आला. सुकलेली लाकूड पाहून त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण त्यावर विसावा घ्यावा आणि जेवण बनवून ते  गावी जावे. त्यानं थांबून जेवण केले, विश्रांती घेऊन गावाकडे निघाला, त्याचवेळी डोक्यावर लाकडाचा गठ्ठा घेऊन ती घाईघाईने येते. अंगणात लाकडाचा जड गठ्ठा टाकून तीन जोरात आवाज दिले - सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, सासू घ्या, लाकडाचा गठ्ठा घ्या, चाळणाची  भाकर द्या, नारळाच्या करवंटीतून  पाणी द्या, आज पाहुणे म्हणून कोण आले आहे? 

हे ऐकून तिची सासू बाहेर येते आणि तिला दिलेला त्रास मुलाला न सांगण्यासाठी विनंती करते– सूनबाई  असे का म्हणते?पहा तुझा पती आला आहे,ये बस, गोड भात खा, अन्न खा, कपडे, दागिने घाल. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर येतो. अंगठी पाहून तो अस्वस्थ होतो.

आईला विचारतो- आई ही कोण आहे?

आई म्हणाली- बेटा, ही तुझी पत्नी आहे. तू गेल्यापासून गावभर भटकती. ती घरातली कोणतीही कामे करत नाही, ती चार वेळा येऊन जाते.

तो म्हणाला- ठीक आहे आई, हे मी पण पाहिलं आणि तू पण, आता दुसऱ्या घराची चावी दे, मी त्यात राहीन.

आई म्हणाली - ठीक आहे, तुझी इच्छा आहे. त्यानंतर दुसऱ्या घरातील तिसऱ्या मजल्यावरची खोली उघडून सर्व वस्तू जमा केल्या. एका दिवसात ते एखाद्या राजाच्या महालासारखे झाले. मग काय उरले होते?  आनंद झाला  ,मग शुक्रवार आला.

तिने पतीला सांगितले – मला संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन  करायचे आहे.

नवरा म्हणाला - आनंदाने कर. तिने उद्यापनाची तयारी सुरू केली. ती भावजयांच्या पोरांकडे जेवनाचं आमंत्रण देवून  आली त्यांनी होकार दिला, पण मागून भावजयांनी त्यांच्या  मुलांना शिकवलं, बघा, जेवण करताना आंबट चिंचा आवळे खाण्याचा हट्ट करा, म्हणजे तिचं उद्यापन पूर्ण होऊ नये.पोरांनी जेवणं केली, खीर खाल्ली, पण खाल्ल्यावर ते म्हणू लागले- आंबट द्या, आम्हाला खीर खायला आवडत नाही, बघायला नकोसा वाटतो.

ती म्हणू लागली - बाळांनो, आंबट कोणाला देणार नाही. हा संतोषी मातेचा प्रसाद आहे.

पोरं उभी राहिली, म्हणाली - पैसे आणा, निरागस सुनेला काही कळलं नाही, पैसे दिले.त्याचवेळी पोरांनी जिद्दीने चिंच आवळे आंबट खायला सुरुवात केली. हे पाहून संतोषी मातेला  राग आला. राजाचे दूत तिच्या पतीला घेऊन गेले. दीरभावजया हवं ते शब्द बोलू लागले. लूटमार करून पैसे आणले आहेत, आता तुरुंगात  हे सगळं कळेल. -

ती रडत रडत माताजीच्या मंदिरात गेली, म्हणू लागली- आई! काय केले, आता भक्त हसवून तू परत रडायला लावतेस आहे.

आई म्हणाली - बेटी, तू उद्यापन करून माझा उपवास मोडला आहेस.

ती म्हणू लागली - आई, मी काही गुन्हा केला आहे, मी चुकून पोरांना पैसे दिले होते, मला माफ कर. मी पुन्हा  उद्यापन करिल. 

आई म्हणाली - आता चूक करू नकोस.ती म्हणते- आता काही चूक होणार नाही, आता सांग माझे पती कसे येतील?

आई म्हणाली- जा बेटी, वाटेत तुझा नवरा सापडेल. ती बाहेर गेली, वाटेत तिचा नवरा सापडला.

तिने विचारले कुठे गेला होतास?

तो म्हणू लागला की, आपण कमावलेल्या पैशाचा कर राजाने मागितला होता, तो भरायला गेलो होतो.

ती खुश झाली आणि म्हणाली ,संतोषी मातेचा विजय असो!  काही दिवसांनी पुन्हा शुक्रवार आला..

ती म्हणाली - मला पुन्हा संतोषी मातेचे उद्यापन करायचे आहे.

नवरा म्हणाला- कर, ती पून्हा भावजयांच्या पोरांना जेवणासाठी सांगण्यास गेलीपोरं जेवणाआधी म्हणू लागली – खीर नको, आंबट खायला द्या.ती म्हणाली - कोणाला आंबट देणार नाही, यायचे असेल तर या,अण  तिने लगेचच ब्राह्मणांच्या पोरांना बोलावून प्रसाद जेवण  वाढवायला  सुरुवात केली, त्यांना दक्षिणा ऐवजी एकेक फळ देऊ लागली.तीच्यावर संतोषी माता प्रसन्न झाली.

आईच्या आशीर्वादाने नवव्या महिन्यात तिला चंद्रासारखा सुंदर मुलगा झाला. मुलगा झाल्यावर ती रोज आईच्या मंदिरात जाऊ लागली.आईला वाटलं- ही रोज येते, आज हिच्या  घरी आपण स्वतः जाऊ. असा विचार करून संतोषी मातेनं भयंकर रूप धारण केले, गूळ आणि हरभऱ्याने माखलेला चेहरा, खोडासारखे ओठ, त्यावर माश्या गुन गुनत होत्या.

दारावर पाऊल ठेवताच तिची सासू घाबरून ओरडली - बघा,वाचवा मला आपल्या घरात कोणी डाकिन घूसतआहे, पोरांनो, तीला हाकलून द्या, नाहीतर ती कुणाला तरी खाईल. मुलं ओरडायला लागली , खिडकी बंद करून पळू लागली,सर्व गोंधळून सैरावैरा धावू लागले. सून आकाशकंदील बघत मांडीवर बाळाला नीजवत होती,तीने संतोषी मातेचे ते रूप ओळखले ती आनंदाने वेडी झाली आणि म्हणाली - आज माझी संतोषी माता माझ्या घरी आली आहे. ती मुलाला दूध पिण्यापासून दूर करत. पूढं झाली. यावर सासूचा राग अनावर झाला.ती म्हणाली - काय झालंय? मुलाला मारले. इतक्यात आईच्या कृपेने फक्त मुलेच दिसू लागली.

ती सातवी सून म्हणाली - सासूबाई , जिचे व्रत मी करते ती ही संतोषी माता आहे,तीची कृपा आज आपणा सर्वांना झाली आहे.सर्वांनी आईचे पाय धरले आणि विनवणी केली - हे आई! आम्ही मूर्ख आहोत, अडाणी आहोत, आम्हाला तुमच्या उपवासाची पद्धत माहित नाही, आम्ही उपवास मोडून मोठा गुन्हा केला आहे, जगत माता संतोषी,  आमचा गुन्हा माफ कर आम्हाला त्याचा पश्चात्ताप झाला आहे.संतोषी  देवी  प्रसन्न झाली. सुनेला जसं फळ दिलं त्याप्रमाणे माता संतोषी आपणा सर्वांवर प्रसन्न  व्हावी. आईने सर्वांना आशीर्वाद  द्यावा, जो मनोभावे संतोषी मातेचं व्रत  करतो त्याची इच्छा पूर्ण होते.

संतोषी मातेचा विजय असो! 


लेबल: , ,